
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने वर्चस्व गाजवले आहे आणि त्या जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जात आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंगच्या जागी मोहम्मद शमीला टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तर इंग्लंडने या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग ११ संघाची घोषणा आधीच केली होती. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने ५ विकेट घेतले आहेत.
वरुण चक्रवर्तीने सामन्यात चार षटकांत फक्त २४ धावा देत ५ बळी घेतले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हा त्यानं दोनवेळा ही कामगिरी केलीय. तो भारतासाठी टी२० क्रिकेटमध्ये दोन वेळा पाच विकेट घेणारा तिसरा भारतीय ठरला. त्याच्या आधी कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमार यांनी टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी दोन वेळा पाच-पाच बळी घेतले आहेत. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप पाच बळी घेतलेले नाहीत.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
वरुण चक्रवर्ती – दोनदा
कुलदीप यादव – दोनदा
भुवनेश्वर कुमार – दोनदा
दीपक चहर – एकदा
युजवेंद्र चहल – एकदा