
रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadega) शानदार फलंदाजीनंतर भारतीय संघाने (Team India) मालिकेतील दुसऱ्या T20 (IND vs ENG 2nd T20I) सामन्यामध्ये इंग्लंडचा (Eng) 49 धावांनी पराभव केला. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर शनिवारी झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. रवींद्र जडेजाच्या नाबाद 46 धावांच्या खेळीमुळे भारताने 20 षटकांत 8 बाद 170 धावा केल्या.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 17 षटकांत 121 धावा करून ऑलआऊट झाला. त्यामुळे भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना रविवार, 10 जुलै रोजी होणार आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाने 29 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 46 धावा केल्या. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 3 बळी घेतले.
.@BhuviOfficial put on an impressive show with the ball & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat England by 49 runs to take an unassailable lead in the series. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/e1QU9hlHCk #ENGvIND pic.twitter.com/LxyxgaKZnr
— BCCI (@BCCI) July 9, 2022
संघात पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने 2-2 बळी घेतले. हर्षल पटेल आणि हार्दिक पंड्यानेही 1-1 बळी घेतला. मालिकेत भारत आता 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा संघ विजय मिळवणार का हे पाहावे लागणार.