IND vs ENG 1st T20 : रोहित शर्माने त्याच्या फिटनेसबद्दल केलं मोठं विधान, म्हणाला- ‘मी पहिल्या T20 साठी फिट’

WhatsApp Group

IND vs ENG 1st T20 : इंग्लंडविरुद्ध T20 मालिका सुरू होण्यापूर्वी, कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाची कमान हाती घेण्यास तयार आहे. बुधवारी, त्याने एजिस बाउल येथे पहिले सराव सत्र केले. तर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी तो साउथम्प्टनमधील संघाशी जोडला गेला आहे. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत टीम इंडिया गुरुवारी, आज ( 7 जुलै ) रोजी इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, ”मी आता कोरोनापासून बरा झालो आहे, माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह येऊन आठ-नऊ दिवस झाले आहेत. आत्ता मला बरे वाटत आहे. मी तीन दिवसांपूर्वीच सराव सुरू केला आहे त्यामुळे आता मी पहिला T20 सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही विश्वचषकावर लक्ष ठेवून आहोत. भारतीय संघासाठी प्रत्येक खेळ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. काही युवा खेळाडूंचा संघात समावेश होणार असून तेही या संधीचे पात्र आहेत.

इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिकेचे वेळापत्रक

सामना तारीख ठिकाण
पहिला सामना 7 जुलै एजिस बाउल
दुसरा सामना 9 जुलै एजबॅस्टन
तिसरा सामना 10 जुलै ट्रेंट ब्रिज
भारताचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक