IND vs BAN: किंग कोहलीने रचला इतिहास; T20 विश्वचषकात केली ‘ही’ मोठी कामगिरी

WhatsApp Group

Virat Kohli T20 WC Record: 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली जबरदस्त लयीत दिसत आहे. यावर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात त्याने एक नवा विक्रम केला आहे. कोहली टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. विराटने एकूण 1024 धावा केल्या आहेत. यापूर्वी, श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने 1016 धावांसह टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्या क्रमांकावर होता.

विराटने अवघ्या 23 डावात हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तर महेला जयवर्धनेने 1016 धावा करण्यासाठी 31 डाव घेतले. महेला जयवर्धनेची सरासरी 39.07 त्याचबरोबर विराट कोहलीने 85 पेक्षा जास्त सरासरीने या धावांचा आकडा गाठला आहे.

या यादीत रोहित शर्माही 921 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल 965 धावांसह रोहित शर्मापेक्षा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत एकूण 34 डाव खेळले आहेत, तर ख्रिस गेलने एकूण 31 डावांमध्ये या धावा केल्या आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशान या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. दिलशानने 34 डावात 897 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 82 धावांची खेळी केली होती. यानंतर नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात विराटच्या बॅटमधून 62* धावांची इनिंग आली. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याची बॅट काहीशी शमोश दिसली. आफ्रिकेविरुद्ध 12 धावा करून विराट पॅव्हेलियनमध्ये परतला.