IND vs BAN 2nd Test : रोमहर्षक सामन्यात भारताने बांगलादेशचा 3 विकेट्सने केला पराभव

WhatsApp Group

IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिका 2-0ने जिंकली. दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक झाला आणि भारत हा सामना हरेल असे वाटत होते पण संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू रविचंद्रन अश्विन यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाला पराभवापासून वाचवले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा पहिल्या डावात 227 धावा झाल्या होत्या. यानंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरला आणि 314 धावांवर सर्वबाद झाला. यासह संघाने 82 धावांची आघाडी घेतली. यानंतर बांगलादेशचा संघ 271 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताला विजयासाठी 144 धावांचे लक्ष्य मिळाले.

144 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने लवकर विकेट गमावण्यास सुरुवात केली आणि तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस संघाने कर्णधार केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्या विकेट्स गमावल्या. त्याचवेळी चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच उनाडकट, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्या विकेट्सही संघाने गमावल्या आणि संघ अडचणीत आला.

एकीकडे भारतीय संघ संकटात सापडला होता आणि बांगलादेशचा उत्साह उंचावला होता, अशा वेळी संघाचा तगडा फलंदाज श्रेयस अय्यरने चांगली खेळी खेळली. बांगलादेशच्या खेळाडूंवरही त्याने वेळोवेळी हल्ले केले. रविचंद्रन अश्विननेही त्याला महत्त्वाच्या वेळी साथ देत संघाला विजय मिळवून दिला.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा