IND vs AUS कसोटी मालिकेचे वेळापत्रक वेळापत्रक जाहीर
IND vs AUS Test Series Schedule: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाते. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पहिला कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पर्थ येथे होणार आहे. दुसरा सामना ॲडलेडमध्ये 6 ते 10 डिसेंबर दरम्यान होणार आहे, जो दिवस-रात्र कसोटी सामना असेल. तिसरा कसोटी सामना गाब्बा येथे, चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे आणि पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळवला जाईल. यावेळी ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे.
SCHEDULE RELEASE: It’s a summer line-up like no other!
Register now for priority access to tickets for when England, India, Pakistan and New Zealand hit our shores in the summer of 2024-25 – https://t.co/eoz38ZyhId pic.twitter.com/d1oSUq3d1m
— Cricket Australia (@CricketAus) March 26, 2024
आतापर्यंत एकूण 16 वेळा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. टीम इंडियाने 10 वेळा ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. कांगारू संघ केवळ 5 वेळा जिंकला आहे. तर 2003-04 मध्ये एकदा ही मालिका अनिर्णित राहिली होती. तर, गेल्या पाच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपैकी भारताने सलग चार सामने जिंकले आहेत. यापैकी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्याच्याच घरच्या मैदानावर दोनदा पराभूत केले आहे. आता पुन्हा एकदा 17वी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियात होणार आहे.
Mark your calendars 🗓
India and Pakistan will visit Australian shores in a blockbuster home summer Down Under 🔥
— ICC (@ICC) March 26, 2024
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी
सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियन संघ गतविजेता असला तरी. पण टीम इंडियाची कामगिरी सातत्याने उत्कृष्ट राहिली आहे. सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही भारतीय संघ अव्वल आहे. यावर्षी टीम इंडियाला बांगलादेशचा दौरा करायचा असून न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात मालिकाही खेळायची आहे. 2021 मध्ये न्यूझीलंडने फायनलमध्ये भारताच्या आशा भंगल्या होत्या.