IND VS AUS: टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक, कांगारूंचा 4 विकेट्सने धुव्वा

WhatsApp Group

IND vs AUS Semi Final Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य दिले होते. भारतानं हा सामना ४ गडी राखत जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ७३ धावांची चांगली खेळी केली. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये स्मिथचा महत्त्वाचा बळी समाविष्ट होता.

उपांत्य फेरीत २६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आला. कांगारू वेगवान गोलंदाजांविरुद्ध रोहितला सुरुवातीपासूनच थोडा संघर्ष करताना दिसला. २९ चेंडूंचा सामना केल्यानंतर फक्त २८ धावा करून हिटमॅन बाद झाला. त्याच्या खेळीदरम्यान, रोहितने तीन चौकार आणि एक षटकार मारला.

भारतीय संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल लवकर बाद झाल्यानंतर टीम इंडिया अडचणीत सापडली. त्यावेळी विराट कोहलीने जबाबदारी घेतली आणि शानदार फलंदाजी केली. त्यानंतर हार्दिक पांड्यानं मैदानावर येत दमदार फलंदाजी करत भारताला विजयाच्या अगदी जवळ आणलं. अखेर केएल राहुलनं षठकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), कूपर कॉनोली, ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झॅम्पा आणि तनवीर संघा.

टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.