IND vs AUS : सामना कधी, कुठे, कसा पाहायचा जाणून घ्या एका क्लिकवर

WhatsApp Group

आयसीसी कसोटी क्रमवारीतील अव्वल दोन संघ आमनेसामने येणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होणार आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया सध्या पहिल्या क्रमांकावर आहे, तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात आल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचे कॅम्पही लवकरच नागपुरात सुरू होणार आहे. मात्र मालिका सुरू होण्यापूर्वी हे सामने कोणत्या तारखेपासून सुरू होतील हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. सामने कुठे खेळले जातील आणि सामन्यांची सुरुवात वेळ काय असेल. इतकंच नाही तर टीव्ही आणि मोबाईलवर लाइव्ह मॅच कशी पाहू शकता. जाणून घ्या सर्व.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका पूर्ण वेळापत्रक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होणार आहे. तिसरा सामना 1 मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यासह कसोटी मालिका संपुष्टात येणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाचा दौरा तिथेच संपणार नाही. यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. त्यांचा पहिला सामना 17 मार्चला मुंबईत होणार आहे. दुसरा सामना 19 मार्चला विशाखापट्टणम येथे तर तिसरा सामना 22 मार्च रोजी चेन्नई येथे होणार आहे. कसोटी मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होतील.

सामना कुठे पाहू शकता?

लाइव्ह टीव्ही आणि मोबाईलवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील सामने कधी आणि कसे पाहता येतील हा प्रश्न आहे. या मालिकेतील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर दिले जातील. म्हणजेच टीव्हीवर तुम्ही स्टार स्पोर्ट्स टीव्ही वाहिनीवर आणि मोबाइलवर डिस्ने प्लस हॉटस्टारवर थेट सामना पाहू शकता. तसेच, डीडी स्पॉट्सवरही सामने थेट प्रक्षेपित केले जातील.

भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, विराट कोहली, रवींद्र जडेजा, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ. , स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टार्क , मिचेल स्वीपसन , डेव्हिड वॉर्नर.