Ind vs Aus: भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 187 धावांचे लक्ष्य; केएल राहुल, सूर्यकुमार यादवने झळकावले अर्धशतक

WhatsApp Group

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सराव सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसनने चार विकेट घेतल्या.

केएल राहुल आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीने भारताला झंझावाती सुरुवात करून दिली आणि पहिल्या 6 षटकात एकही विकेट न गमावता 70 धावा जोडल्या. यादरम्यान राहुलने 27 चेंडूत अर्धशतक झळकावले, तर रोहितनेही काही सुंदर शॉट्स खेळले. पॉवरप्ले भारताच्या नावावर होता पण त्यानंतर पुढच्या चार षटकांत ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन केले.

यादरम्यान ग्लेन मॅक्सवेल आणि अॅस्टन अगर यांनी अनुक्रमे केएल राहुल (57) आणि रोहित शर्मा (15) यांना बाद करून दोन धक्के दिले. 10 षटकांनंतर भारताने 2 गडी गमावून 89 धावा केल्या. 10 ते 15 षटकांदरम्यान भारताने 49 धावा केल्या परंतु यादरम्यान त्यांनी विराट कोहली (19) आणि हार्दिक पांड्या (2) यांचे विकेटही गमावले. शेवटच्या 5 षटकांत भारताला केवळ 48 धावा करता आल्या आणि निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 186 धावा केल्या. यादरम्यान सूर्यकुमार यादवने 32 चेंडूत अर्धशतक झळकावले.

भारताचा संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, दीपक हुडा

ऑस्ट्रेलियाचा संघ 

आरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस , टिम डेव्हिड, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन