IND vs AUS: विराटला भेटण्यासाठी चाहता घुसला थेट मैदानात, पहा व्हिडिओ

0
WhatsApp Group

IND vs AUS: वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जात आहे. तर, प्रथम फलंदाजीला आलेली टीम इंडिया सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत आहे. पण त्याचवेळी पॅलेस्टाईनचा एक समर्थक स्टेडियममध्ये घुसला आणि त्याने विराट कोहलीला जबरदस्तीने मिठी मारण्यास सुरुवात केली. मात्र, विराटनेच या चाहत्याला वेगळे केले. पण, स्टेडियममध्ये अशाप्रकारे फॅन घुसल्याने नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात पॅलेस्टाईन समर्थक सुरक्षा तोडून मैदानात घुसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्याला तत्काळ अटक केली. याआधी कोलकाता येथील ईडन गार्डन येथे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात पॅलेस्टाईनचे समर्थन करणारे लोक हातात झेंडे घेऊन दिसले होते. सध्या इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

या डावात विराट कोहली 54 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने संयमी खेळी खेळून टीम इंडियाला सुरुवातीच्या धक्क्यांपासून वाचवले. चालू विश्वचषकातील त्याचा हा 9वा अर्धशतक प्लस स्कोअर होता. या मोसमात त्याने 6 अर्धशतके झळकावली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन 

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.