
IND vs AUS Match Preview: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील हा शेवटचा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. दोन्ही संघ सध्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत, त्यामुळे हैदराबाद येथे होणाऱ्या या सामन्याच्या निकालावरच मालिकेचा विजेता घोषित केला जाईल.
या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघ हरला होता. मोहालीत भारतीय संघाला 208 धावांची मोठी धावसंख्याही वाचवता आली नाही. मात्र, दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. मालिकेतील हा दुसरा सामना पावसामुळे प्रभावित झाला, ज्यामध्ये फक्त 8-8 षटके खेळली गेली. भारताने येथे शेवटच्या षटकात 6 विकेट्स राखून विजय मिळवला.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर.
ऑस्ट्रेलिया संघ –
आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.