IND vs AFG: रोहितच नंबर 1! बनला सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

WhatsApp Group

Rohit Sharma: अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माने एक मोठा विक्रम केला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने एका खास विक्रमात विराट कोहलीला मागे टाकले आहे. त्याने असा पराक्रम केला आहे जो यापूर्वी कोणताही भारतीय कर्णधार करू शकला नाही. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो आपले खाते उघडू शकला नाही, परंतु यावेळी तो योग्य वेळी फॉर्ममध्ये परतला.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले. विराट कोहलीला मागे टाकत तो टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

विराट कोहलीला मागे टाकले

विराट कोहलीने 50 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. या काळात त्याने 47.57 च्या सरासरीने 1,570 धावा केल्या. यामध्ये 13 अर्धशतकांचा समावेश आहे. पण आता रोहित शर्माने विराटचा हा आकडा पार केला आहे. कर्णधार म्हणून टी-20 धावांच्या बाबतीत रोहित आता फक्त आरोन फिंच, बाबर आझम आणि केन विल्यमसनच्या मागे आहे.

अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय कर्णधार

रोहित, कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे फक्त तीन भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी कर्णधार म्हणून 1,000 पेक्षा जास्त टी-20 धावा केल्या आहेत. रोहित आणि कोहली या दोघांच्या नावावर 1,500 हून अधिक धावा आहेत, तर धोनीने कर्णधार म्हणून 1,112 धावा केल्या होत्या.

 

रोहित शर्माचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पाचवे शतक आहे. याच्या अगोदर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने पाच शतके झळकावली नव्हती. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मानेही या कालावधीत 10 चौकार आणि 6 षटकार मारले. हे ऐतिहासिक शतक आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा दोन सामन्यात 0 धावांवर बाद झाला होता. या सामन्यात त्याने दमदार कामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांची यादी

  • रोहित शर्मा – 5 शतके
  • सूर्यकुमार यादव – 4 शतके
  • ग्लेन मॅक्सवेल – 4 शतके
  • बाबर आझम – 3 शतके
  • कॉलिन मुनरो – 3 शतके