कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदारचा ‘हा’ अविश्वसनीय डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल!

WhatsApp Group

मुंबई – आज काल प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर काहीना काही व्हिडिओ, फोटो व्हायरल होतंच असतात. काही दिवसांपूर्वी असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ होता विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार हीचा. सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून ‘कॉमेडी क्वीन’ म्हणून प्रसिद्ध झालेली सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. काही चाहत्यांना तर विशाखाचा हा भन्नाट डान्स पाहून डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विशाखा सुभेदार आणि नृत्यदिग्दर्शिका लतिका या दोघी ‘घे लल्लाटी भंडार’ या गाण्यावर दमदार डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमधील विशाखाचा अप्रतिम डान्स पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. आपल्या बहारदार कॉमेडीसाठी प्रसिद्ध असलेल्या विशाखाचं हे वेगळ रूप पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. विशाखाने हे दाखवुन दिलं की प्रयत्न केलं तर सगळं काही साध्य करता येतं.

‘घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार’ या गाण्यावर डान्स करताना विशाखा आणि लतिका या जोगतीणीच्या रूपात दिसत आहेत. जोगवा हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक पारंपारिक कला प्रकार असून देवी महालक्ष्मी, अंबा आणि येल्लम्मा यांच्यासमोर गायला जातो. जोगवा म्हणजे जोगता किंवा जोगतीन म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीला दिलेली भिक्षा असते.

मात्र या