
सिंधुदुर्ग – भाजपचे कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची आज भेट घेतली. या भेटीत गणेशोत्सवापूर्वी मुंबई ते चिपी विमानतळावर विमानांची उड्डाणे वाढवण्याबरोबरच कोकणातील पर्यटन वाढीसाठी चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला मान्यता द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.