राज्यात उन्हाचा चटका, रात्रीसह दिवसाच्या तापमानामद्धे वाढ

WhatsApp Group

पुणे – दिवसा निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानामुळे राज्यामध्ये सध्या दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी रात्री अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे रात्रीच्या किमान तापमानामध्येही वाढ झाल्यामुळे रात्रीचा गारवा कमी झाला आहे.राज्यात गेल्या आठवडय़ापासून रात्रीच्या किमान तापमानामध्ये वाढ सुरू झाली होती.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार किमान तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये २ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये सर्वच भागांत रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी वाढले आहे.

कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ामध्ये पुढील चार दिवस कोरडे हवामान राहणार आहे. मात्र विदर्भात २४ फेब्रुवारीला पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.