पावसाळ्यात या आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश करा

WhatsApp Group

पावसाळा हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा ऋतू आहे. परंतु, पावसाळ्यात आपल्याला इतर समस्यांना देखील सामोरे जावे लागते. पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य रोग संक्रमण करत असतात. आपण पावसाळ्याच्या दिवसांत काय खातो यावर बरेच काही अवलंबून असते. भाज्या, फळे आणि मसाले यांसारखे आरोग्यदायी पदार्थ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत होते. त्यामुळे, आपल्या खाद्यपदार्थांच्या यादीतून आपण कोणते पदार्थ निवडायला हवे हे जाणून घेऊया.

  • पावसाळयाच्या दिवसांत आल्याचे सेवन फायदेशीर ठरते. आल्याचे सेवन केल्यास पचनसंस्था सुधारते. सर्दी व तापापासुन आराम मिळते.
  • कारले चवीला अत्यंत कडू असले तरी पावसाळ्यामध्ये हे खूप फायदेशीर ठरते. यात व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्त्रोत आहे जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
  • लसणात असणाऱ्या गुणधर्मामुळे आपली चयापचय वाढते तसेच त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करतात. त्यासाठी पावसाळ्यामध्ये लसणाचे सेवन करायला हवे.

पावसाळ्यात आजार होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

  • पावसाळ्यात आपण रॉक मीठाचा वापर स्वयंपाकघरात करायला हवा. याचे सेवन केल्यास पचनशक्ती वाढण्यास मदत होते.
  • मूग डाळीत प्रथिने, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे असून आरोग्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे. पावसाळ्यात मूग डाळीचे सेवन फायदेशीर ठरते.
  • पावसाळ्यात (Monsoon) बऱ्याच जणांना पचनसंस्थेचा त्रास होतो अशावेळी आपण मधाचे सेवन करायला हवे. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत होते.
  • घसा खवखवणे, फ्लू, खोकला आणि सर्दी टाळण्यासाठी हळद (turmeric) उपयुक्त ठरते. हळदीत असणाऱ्या गुणधर्मामुळे आपण त्याचे पावसाळ्यामध्ये सेवन केल्यास आराम मिळतो.