Video: मुंबईत विलेपार्लेत सात घरं नाल्यात कोसळली

WhatsApp Group

घराला तडे गेल्यामुळे मध्यरात्री सात घरं बाजूला असलेल्या नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं विलेपार्लेतील इंदिरानगरमध्ये खळबळ उडाली आहे. या घरांमध्ये कुणीही नसल्यामुळे सुदैवानं यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. इंदिरानगरच्या झोपडपट्टी परिसरात ही घटना घडल्याने बचाव पथकानं परिसरातील इतर लोकांना दुसरीकडे हलवलं आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा