Video: भर सभेत भाजपच्या मंत्र्याने महिलेच्या कानाखाली लागावली! विरोधकांची हकालपट्टीची मागणी

WhatsApp Group

वीरण्णा सोमण्णा यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ते कर्नाटक सरकारमध्ये पायाभूत सुविधा आणि विकास मंत्री आहेत. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मंत्री व्ही सोमण्णा एका महिलेला थप्पड मारताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला तक्रार करण्यासाठी आली होती मात्र त्यांनी तिला भर सभेत कानाखाली लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, चामराजनगर जिल्ह्यातील हंगला गावात ही घटना घडली. मंत्री सोमण्णा हे लोकांना जमीन कागदपत्रे वाटण्यासाठी एका कार्यक्रमात आले होते. कर्नाटक जमीन महसूल कायद्यांतर्गत, ग्रामीण भागात जमीन नियमितीकरणासाठी सुमारे 175 लोकांना हक्कू पत्रे मिळणार होती. त्यामुळे कार्यक्रमाला लोकांचीही मोठी उपस्थिती होती. सोमण्णा हे पत्रांचे वाटप करत होते. तेवढ्यात एक महिला गर्दीतून बाहेर आली आणि सोमण्णा यांच्या दिशेने येते.

या महिलेने तिच्या जमिनीचा ताबा मिळत नसल्याची तक्रार केली होती. काउंटरजवळचे लोक आणि पोलिस त्यांना समजावून सांगत होते की, ती महिला अगदी जवळ आली आहे, म्हणून मंत्री सोमण्णा यांनी त्यांच्यावर हात ठेवला. थप्पड मारल्यानंतर महिला लगेच मंत्री सोमण्णा यांच्या पाया पडली. असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

महिला काय म्हणाली?

मंत्र्याने आपल्याला थप्पड मारली नाही, पण त्यांनी सांत्वन केलं असं ती महिला म्हणाली.  मी गरीब कुटुंबातील आहे. मी त्यांच्या पाया पडले आणि मला जमीन देण्यासाठी त्यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी माझे सांत्वन केले. त्यांनी आम्हाला जमीनही दिली आहे आणि आम्ही दिलेले 4000 रुपये त्यांनी परत केले आहेत. ते देव आहेत आमच्यासाठी. आम्ही त्यांची घरी पूजा करतो. आम्ही त्यांचे फोटो इतर देवतांसह ठेवले आहेत. असं ती महिला म्हणाली.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपला विरोधकांनी घेरले जात आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मंत्र्याला बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेनेही त्यांच्या कृतीबाबत कर्नाटक सरकारवर प्रश्न उपस्थित केले.