IND vs SA 3rd ODI: तिसऱ्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ 99 धावांवर गारद, फिरकीपटूंनी केली कमाल
IND vs SA 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. पावसामुळे टॉसला उशीर झाला. शिखर धवनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि संघ 99 धावांत गारद झाला. अशा प्रकारे भारताला सामना आणि मालिका जिंकण्यासाठी 100 धावा करायच्या आहेत. भारत कोणताही बदल न करता मैदानात उतरला. त्याचबरोबर या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डेव्हिड मिलर आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार टेंबा बावुमा, तर दुसऱ्या सामन्यात कर्णधारपद केशव महाराज होते.
That innings 🤯
What a performance from India – South Africa collapse to their fourth-lowest total in ODIs 😢#INDvSA
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 11, 2022
भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद आणि मोहम्मद सिराज यांना 2-2 यश मिळाले. ही दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्धची वनडेतील सर्वात कमी धावसंख्या आहे.