हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि अक्षर पटेल करू शकतात हे मोठे विक्रम

WhatsApp Group

आयपीएल 2022 चा 50 वा सामना आज (गुरुवारी) दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होणार आहे. हैदराबादने स्पर्धेत आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत आणि 5 जिंकले आहेत. तर दिल्लीने 9 पैकी 4 जिंकले. शेवटच्या सामन्यात लखनौने दिल्लीचा 6 धावांनी पराभव केला. आज होणाऱ्या या सामन्यात ऋषभ पंत, पृथ्वी शॉपासून अक्षर पटेलपर्यंत अनेक विक्रम होऊ शकतात.

अक्षर पटेल 

दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आज होणाऱ्या सामन्यात विकेट्सचे शतक करू शकतो. त्याने आयपीएलच्या 118 सामन्यात 7.24 च्या सरासरीने 99 विकेट घेतल्या आहेत. 1 विकेट घेताच तो 100 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्लबमध्ये सामील होईल. याशिवाय तो आयपीएलमध्ये 50 झेल घेणारा क्षेत्ररक्षकही बनू शकतो. यासाठी त्याला फक्त एक झेल घ्यावा लागेल.

ऋषभ पंत 

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आपल्या नावावर एक खास विक्रम करू शकतो. जर पंतने 56 धावा केल्या तर त्याच्या T20 क्रिकेटमधील (एकूण) 4000 धावा पूर्ण होतील.

पृथ्वी शॉ

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉही या सामन्यात विक्रम करू शकतो. दमदार फटकेबाजी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शॉने हैदराबादविरुद्ध 10 चौकार मारले तर त्याचे आयपीएलमधील 200 चौकार पूर्ण होतील. शॉने आतापर्यंत 62 आयपीएल सामन्यांमध्ये 190 चौकार मारले आहेत.