सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नं. 1, इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी…

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. मॉर्निंग कंसल्टच्या सर्व्हेत मोदींना सर्वाधिक 76 टक्के इतके रेटिंग मिळाले आहे.

WhatsApp Group

Global Leaders Rating: जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आघाडीवर आहेत. 76 टक्के मान्यता रेटिंगसह, ते जगातील सर्वात लोकप्रिय नेता बनले आहेट. मॉर्निंग कन्सल्टने ही यादी तयार केली आहे. या यादीत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ओब्राडोर ६६ टक्के रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहेत. स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षांचे रेटिंग 58 टक्के आणि ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांचे रेटिंग 49 टक्के होते.

लोकप्रिय नेत्यांच्या यादीत या नेत्यांची नावे आहेत

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेटिंग 76 टक्के आहे.
  • मेक्सिकन अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर 66%
  • स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बर्सेट 58%
  • ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा 49%
  • या सर्व्हेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी 41 टक्क्यांसह सहाव्या क्रमांकावर आहेत.
  • युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जो बायडन 40% च्या मान्यता रेटिंगसह यादीत सातव्या क्रमांकावर आहेत.

राजकीय गुप्तचर संशोधन संस्थेने गोळा केलेला हा डेटा 22 जागतिक नेत्यांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. हा डेटा 6 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत गोळा करण्यात आला आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत.

सप्टेंबर महिन्यात केलेल्या या सर्वेक्षणात 76 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मान्यता दिल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे या सर्वेक्षणात पीएम मोदी सतत टॉपवर आहेत आणि त्यांचे अप्रूव्हल रेटिंगही 70 पेक्षा जास्त आहे.