अजित पवारांनी शेवटच्या २ दिवसांत १६९० कोटींच्या कामांना दिली मंजुरी

WhatsApp Group

मुंबई – मावळते वित्त व नियोजन मंत्री अजित पवार निधीवाटपात दुजाभाव करत असल्याचे शिवसेनेपासून दुरावलेल्या मंत्री व आमदारांच्या नाराजीचे एक कारण सांगितले गेले. शेवटच्या दोन दिवसात सरकारने मंजूर केलेल्या १,६९० कोटींच्या कामांपैकी एकट्या पुणे जिल्ह्यातील विकास कामांसाठी १,२९३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

शरद पवार यांनी याचा इन्कार करत निधीवाटप नियमानुसारच झाल्याचा खुलासा केला असला तरी त्यांच्या कामाच्या “झपाट्या’चा शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्यय आला आहे. शरद पवार कोरोनामुळे क्वारंटाईन असले तरी सरकारच्या शेवटच्या दोन दिवसात काढण्यात आलेल्या शासन निर्णयात पुणे जिल्ह्यातील विकास कामांसाठी सर्वाधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.

या दोन दिवसात ११२ शासन आदेश काढण्यात आले. त्याद्वारे विविध खात्यांच्या १६०९ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी १२९३ कोटी रुपयांची मंजुरी पुणे जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी आहे. यामध्ये जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकासासाठी ३४९ कोटी, संभाजी महाराज समाधी स्थळ विकासासाठी २६९ कोटी आणि नगरपालिका, परिषदा, पंचायतींसाठी ६७५ कोटींचा निधी देण्यात आला आहे.