आयपीएल 2022च्या पहिल्याच सामन्यात कोलकाताने चेन्नईचा पराभव करत दमदार सुरुवात केली आहे. चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचा उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 6 गडी राखून पराभव केला. नव्या कर्णधारांच्या या स्पर्धेत कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने बाजी मारली आणि पहिल्याच सामन्यात रवींद्र जडेजाने निराशा केली.
कोलकतासमोर 132 धावांचे आव्हान चेन्नईने दिले होते. मात्र 132 धावांचे आव्हान कोलकाताने सहज पार केले. कोलकाता संघाला शेवटच्या 12 चेंडूत विजयासाठी 6 धावांची गरज होती. अॅडम मिल्नेने 19 वे षटक केले. पहिल्या चेंडूवर सिंगलला दुसऱ्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या. श्रेयस अय्यरने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून कोलकाताला विजय मिळवून दिला.
That’s that from Match 1 of #TATAIPL.@KKRiders win by 6 wickets ????????
Scorecard – https://t.co/b4FjhJcJtX #CSKvKKR #TATAIPL pic.twitter.com/3yTEtffmYy
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2022
कोलकाताने हा सामना 6 गडी राखून जिंकून IPL 2022 ची धमाकेदार सुरुवात केली. कोलकाताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 44 धावांची खेळी खेळली. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने 3 तर मिचेल सँटनरने एक विकेट घेतली.