अंबरनाथ येथून एक धक्कादायक बातमीसमोर आली आहे. येथे बापानेच आपल्या 12 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अंबरनाथमधील स्वामीनगर परिसरातील ही घटना आहे.
मुलाची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकण्याच्या प्रयत्नात असतानाच आरोपीला स्थानिक लोकांनी पाहिले. त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. आनंदकुमार गणेश असं या आरोपीचं नाव आहे. आरोपी हा त्याच परिसरातील गटार आणि चेंबर साफ करण्याचे काम करतो. त्याचा मुलगा आणि पत्नी त्याच्यापासून वेगळं राहत होते याच रागातून त्याने आपल्या मुलांची हत्या केल्याचं सांगण्यात येतं आहे.