दोन डोकी, तीन हाताचे बाळ पाहिलंत का?

WhatsApp Group

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रतलाम जिल्ह्यात (Ratlam) एका महिलेने अनोख्या मुलाला जन्म दिला आहे. या जन्मलेल्या बाळाला दोन डोकी आणि तीन हात आहेत. सध्या या बाळाला इंदूरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हे प्रकरण रतलाम जिल्ह्यामधील असून जावरा इथं राहणाऱ्या शाहीनने या अनोख्या बाळाला जन्म दिला आहे.

या मुलाला दोन डोकी आणि तीन हात आहेत. तिसरा हात दोन तोंडांच्या मागील बाजूस आहे. या मुलाला काही काळ रतलामच्या एसएनसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आणि तेथून त्या बाळाला इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये (MY Hospital Indore) रेफर करण्यात आलं आहे. सोनोग्राफीमध्ये हे बाळ जुळ्यासारखं दिसत होतं. एसएनसीयूचे प्रभारी डॉ. नावेद कुरेशी यांनी सांगितले की, मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

डॉ. कुरेशी म्हणाले, अशा वेळी अनेक मुले एकतर गर्भातच संपतात आणि मूल जन्माला आले तरी ते केवळ 48 तास जगू शकतं. त्यामुळे शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध असला, तरी यानंतरही 60 ते 70 टक्के मुलंही जगत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. याला डायसेफॅलिक पॅरापॅगस (Dicephalic Parapagus) असे म्हणतात. हा जुळ्यांचा एक दुर्मिळ प्रकार आहे, असं डॉ. ब्रजेश लाहोटी यांनी सांगितलं आहे.

सध्या मुलाला इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलच्या (MY Hospital) आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे, तर आईला रतलाम हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.

???? ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा ???? https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms

For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook