लग्न म्हटल्यावर सर्वांच्या नजरेसमोर मोठा स्टेज, सजावट, उंची पोशाख, डेस्टिनेशन वेंडिग, प्रीवेडिंग शूट असे नवीन ट्रेंड येतात. मात्र हल्ली लग्नाच्या वरातीतही हटके प्रकार करण्याचा ट्रेंड निघाला आहे. लग्नाची वरात म्हटलं की कार किंवा सजवलेल्या घोडागाडीतून जाणारे वधू-वर तुम्ही पहिलेच असतील.
हल्लीतर हेलकॉप्टरमधून देखील लग्नाची वरात नेण्याचा ट्रेंडही सुरू झाला आहे. मात्र एक अनोखी वरात पुण्यातील पुरंदरमधून काढण्यात आली आहे. एका विवाह सोहळ्यात चक्क बैलगाडीवरुन वरात काढण्यात आली आहे. नवरदेवाने घेतलेल्या या निर्णयाचे सगळीकडून कौतुक केलं जातं आहे.