पुण्यात 14 वर्षाच्या मुलाचा 23 वर्षीय तरुणीवर 2 दिवस बलात्कार

WhatsApp Group

पुणे – पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 14 वर्षीय मुलाने 23 वर्षांच्या दिव्यांग तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

16 आणि 18 मे रोजी तरुणीचे कुटुंबीय घरी नसताना तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती सांगण्यात येत आहे. त्या तरुणीची मावशी बुधवारी दुपारी घरी परतली असता तरुणी अस्वस्थ आणि हादरलेल्या अवस्थेत दिसून आली त्यानंतर घडलेला सर्व प्रकार समोर आला.