
परभणी – दर्गा रोड येथे लग्नाच्या जेवणातून १०० हून अधिक लोकांना विषबाधा (Food Poisoning) झाली असून सर्व बाधित लोकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यात बाधित लोकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे वृत्त समजताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परभणीतील दर्गा रोड परिसरात असलेल्या मेहबूब फंक्शन हॉल येथे एक विवाह समारंभ पार पडला.
या सोहळ्यामध्ये जेवण झाल्यानंतर काही वेळाने 100 पेक्षा जास्त लोकांना पोटदुखी, उलटी आणि मळमळ होणे असा त्रास जाणवू लागला. वेळीच सावधगिरी बाळगत या सर्वांना परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.