महाराष्ट्रात तूर्तास मास्कमुक्ती नाही, मात्र निर्बंध शिथिल होणार!

WhatsApp Group

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध लवकरच शिथिल करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांना निर्बंध शिथिलतेवर विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

तसेच महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का? यावरही त्यांनी स्पष्ट उत्तरं दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी बोलताना म्हणाले, आज लगेचच महाराष्ट्र आणि देशात मास्कमुक्ती केली पाहिजे असं अजिबात नाहीय.

हेही वाचा – निर्बंध उठले, वारकरी पोहोचले, पंढरपूरात लाखो भाविक दाखल

पण युके सारख्या देशाने याबाबत मास्कमुक्तीचा निर्णय का घेतला?पाश्चिमात्य देशांनी मास्कमुक्तीचा निर्णय का घेतला आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. याबाबत संपूर्ण माहिती आपण संकलित करत आहोत असं राजेश टोपे यावेळी बोलताना म्हणाले.

इतक्या मोठ्या लोकशाही असलेल्या देशात तात्काळ मास्कमुक्ती करून कुठलंही संकट ओढवायचं नाहीय. त्यामुळे तूर्तास मास्कमुक्ती शक्य नाहीय. मात्र निर्बंध शिथिल केले जातील असं राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – ना धोनी, ना रोहित ना कोहली…IPL च्या इतिहासात ‘या’ खेळाडूवर लागली होती पहिली बोली