कोल्हापूर येथे धबधब्याच्या प्रवाहात युवक गेला वाहून

0
WhatsApp Group

कोल्हापूर मधील राधानगरी तालुक्यातील तोरस्करवाडीत धबधबा पाहण्यासाठी मित्रांसोबत गेलेला एक मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रणव भिकाजी कलकुटकी (वय 19) असं या मुलाचे नाव आहे. मुसळधार पावसामुळे आणि पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत. काल अंधार झाल्यामुळे शोधकार्य थांबवले. यामुळे तो बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

सर्व मित्र धबधब्यात आनंद लुटत असताना प्रणव आपल्यासोबत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रणवची शोधाशोध सुरू केली. सर्वांसोबत आनंद लुटताना प्रणव पाण्याच्या प्रवाहाबरोबर कधी वाहून गेला, हे त्यांना समजलच नाही. त्यानंतर त्याच्या मित्रांनी तोरस्करवाडी ग्रामस्थांना माहिती दिली त्यांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला. यानंतर राधानगरी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.