
रायगड – रायगड जिल्ह्यातील घोणसे घाटामध्ये खासगी बस कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू (Death) झाला. या बसमधील ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी आहेत. जखमींना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यामधील म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील मुबंईला राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी जात होते. म्हसळा येथील घोणसे घाटामध्ये त्यांची बस कोसळली. हा अपघात होताच परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. म्हसळा पोलिसांनी (Police) घटनास्थळी मदतकार्य सुरु केले आहे.