Urfi Javedचा आणखी एक व्हिडिओ आला समोर, बोल्ड अवतार पाहून चाहते झाले घायाळ

WhatsApp Group

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्डनेसमुळे (Boldness) नेहमीच चर्चेत असते. हटके फॅशन स्टाईलमुळे (Fashion Style) उर्फीला ट्रोल देखील केले जाते. असे असताना उर्फीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये उर्फीने नेहमीप्रमाणे बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत.

उर्फी जावेद तिच्या ड्रेसवर अनेक नवीन नवीन प्रयोग करत असते. परंतु काही वेळा ती तिच्या कपड्यांवरून ट्रोल देखील होत असते. आता उर्फीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. तिच्या बोल्ड अवतारामुळे खळबळ उडवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

व्हिडिओमध्ये उर्फी जावेद हिने दोऱ्यांनी बनवलेला ड्रेस परिधान केला आहे. ब्रॅलेटसह दोरीने विणलेला स्कर्टमध्ये उर्फी सुपर हॉट दिसत आहे. विशेष म्हणजे ती कॅमेऱ्यासमोर तिचा हटके ड्रेस फ्लॉंट करताना दिसते आहे. उर्फीने परिधान केलेला स्कर्ट खूपच छोटा आहे. त्यात एक स्लिट आहे. त्यामुळे तिने पु्न्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.