
दिल्लीतील देशबंधू गुप्ता रोड पोलीस स्टेशन परिसरात एका शाळेतील शिक्षकाने एका मुलीला पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जखमी मुलीला उपचारासाठी बडा हिंदूराव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशबंधू गुप्ता रोड पोलिस स्टेशनच्या बीट अधिकाऱ्याला शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून एका शाळकरी मुलीला शिक्षकाने खाली फेकल्याची माहिती लोकांकडून मिळाली. या माहितीवर एसएचओसह अन्य पोलीस तात्काळ फिल्मिस्तानसमोरील मॉडेल बस्तीच्या प्राथमिक शाळेत म्हणजेच घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी पोलिसांनी जमावाला घटनास्थळावरून हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली.