श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामुल्ला आणि पुलवामा जिल्ह्यामध्ये (Baramulla and Pulwama districts) सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे. भारतीय जवानांनी (Lashkar-e-Taiba) लष्कर-ए-तैयबाच्या (एलईटी) चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
मिळलेल्या एका गुप्त माहितीनुसार कारवाई करत सुरक्षा दलांनी सोपोरमधील रफियााबादच्या नदिहाल भागाला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर चार दहशतवाद्यांना पकडण्यात यश आल्याचं पोलीस प्रवक्त्याने सांगितले.
शोध मोहीमदरम्यान लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित संघटनेच्या एका दहशतवाद्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. प्रवक्त्याने पुढे सांगितले की, अटक केलेल्या व्यक्तीचे नाव फिरदौस अहमद वानी असून तो चेक सेरी पट्टणचा रहिवासी आहे. गुन्ह्यात वापरलेले साहित्य, एक एके-56 रायफल, शस्त्रास्त्रे आणि 30 काडतुसे जप्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान गुप्तचर माहितीनुसार कारवाई करत सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये लष्कर-ए-तैयबाशी संबंधित तीन दहशतवादी साथीदारांनाही अटक करण्यात यश आलं आहे.वागम मधला रहिवासी आमिर नजीर हजार, सुहैल अहमद भट आणि बशीर अहमद गनी यांचा मुलगा नसीर हुसेन अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून ग्रेनेड आणि एके-47 रायफलसह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.