New Zealand Vs Pakistan: क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंना अनेकदा दुखापत होते आणि पंचांसोबतही असेच काहीसे घडते. असाच काहीसा प्रकार पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेत घडला. या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान मैदानावरील अंपायर अलीम दार यांना चेंडू लागला. अलीम दार चेंडू लागल्याने चिडले आणि त्यांनी पाकिस्तानी खेळाडूची जर्सी जमिनीवर फेकली. अलीम दार यांना ही दुखापत एका थ्रोमुळे झाली जी थेट अलीम दार यांच्या उजव्या पायाला लागली.
अलीम दारला ही दुखापत 36व्या षटकात झाली. हारिस रौफ गोलंदाजी करत होता आणि चौथ्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सने मिडविकेटवर शॉट खेळला. न्यूझीलंडच्या फलंदाजांना 2 धावा चोरायच्या होत्या पण पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद वसीमने पटकन चेंडू पकडला आणि तो नॉन स्ट्राइक एंडला फेकला. अंपायर अलीम दार तिथेच उभे होते आणि फेकलेला चेंडू थेट त्यांच्या पायाला लागला. चेंडू लागताच अलीम दार वेदनेने ओरडले आणि हरीस रौफची जर्सी त्यांनी जमिनीवर फेकली. BBL 2022-23: बेन कटिंग बनला ‘सुपरमॅन’, पकडला अप्रतिम झेल, पहा व्हिडिओ
Ouch 😬🙏#PAKvNZ | #TayyariKiwiHai pic.twitter.com/JyuZ0Jwxi5
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 11, 2023
अलीम दार यांना वेदना होत असल्याचे पाहून वेगवान गोलंदाज नसीम शाह त्याच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांना खाली बसून त्याच्या पायाची मालिश केली. अलीम दार यांना चेंडू लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.