महाराष्ट्रातील राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, MSBSHSE ने SSC, HSC साठी महाराष्ट्र बोर्ड पुरवणी परीक्षा 2023 जाहीर केली आहे. SSC आणि HSC वेळापत्रक MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर तपासता येईल. 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गांसाठी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेतली जाईल.
परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरूपात देण्यात येणारं वेळापत्रक अंतिम असणार आहे.