मुंबईत रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेनं घेतला निर्णय

WhatsApp Group

मुंबई – मुंबईत (Mumbai) रेल्वेनं (train) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवसापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले. राज्य सरकारने कोविड निर्बंध (Covid 19 restrictions) हटवताना रेल्वेबाबतही एक मोठी अपडेट दिली आहे. रेल्वेने लसीकरणाशी संबंधित पर्याय आता तिकीट ॲपमधून हटवला आहे.

कोविडसंदर्भातल्या निर्बंधामुळे फक्त लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र आता राज्य सरकारने निर्बंध हटवल्यामुळे लस घेतल्याचे प्रमाणपत्र तिकीट ॲपशी लिंक करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य सरकारने निर्बंध उठवण्याच्या निर्देशांनुसार, रेल्वेनेही सर्व कोविडसंदर्भातले निर्बंध उठवले आहेत.

त्यामुळे आता मुंबईतल्या रेल्वेसाठी काऊंटरवर आणि ॲपवर सर्वांकरिता तिकिट सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्याच प्रमाणपत्रं तिकिट ॲपशी लिंक करण्याची गरज नाही आहे. याबाबतच्या सर्व सूचना आता मागे घेण्यात आल्या असल्याचे रेल्वेच्या प्रवक्त्याणं सांगितलं आहे.

???? ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा ???? https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms

For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook