मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. देशातील अनेक राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा बीएमसीचे वार्षिक बजेट अधिक आहे, यावरून बीएमसीच्या निवडणुकीचे महत्त्व लक्षात येते. मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरात राहणाऱ्या लोकांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली आहे. बीएमसी हा शिवसेनेचा श्वास मानला जातो. वर्षानुवर्षे येथे फक्त शिवसेनेची सत्ता आहे.
या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करण्याचा संकल्प भाजपने केला आहे. यासंदर्भात रणनीती आखण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत भाजप नेते दोन गटात विभागले गेले आहेत. यामुळे यूपी विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका सहन करावा लागू शकतो.
Former CM & LoP Maharashtra Assembly @Dev_Fadnavis in a meeting with @BJP4Mumbai leaders in Mumbai. @BJP4Mumbai President @MPLodha, @ShelarAshish, MP @iGopalShetty, @manoj_kotak, @BhatkhalkarA, MLAs, other leaders are present. pic.twitter.com/8cvvoDwAFO
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) January 25, 2022
बैठकीनंतर बोलताना आशिष शेलार म्हणाले, या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला खिंडार पाडून कमळ कसं फुलेल यावर संकल्प करण्यात आला. त्याचवेळी पत्रकारांनी शेलार यांना प्रश्न केला की, येत्या निवडणुकीची रणनीती काय असेल, राज ठाकरेंचा पक्ष मनसेसोबत युती करण्याबाबत काय निर्णय झाला आहे? यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. भाजपच्या या ठरावावर शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘निवडणूक येऊ द्या, बघू कमळ फुलते की सुकते’. किंवा धनुष्यातून निघणारा बाण निशाणाला लागतो.
आशिष शेलार पुढे म्हणाले, मुंबई पालिकेची निवडणूक वेळेवर होणे गरजेचे आहे. या निवडणुकीच्या तारखेबद्दल आम्हाला कोणतीही माहिती नाही. याबाबत जनतेसमोर आणि आपल्यासमोर स्पष्टता असली पाहिजे. तारीख पुढे सरकवत असतील तर सत्ताधाऱ्यांनी ते आधी सांगाव. विलंबाचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे. असं शेलार बोलताना म्हणाले आहेत.