
Maharashtra Cabinet Decision: मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्य सरकारने घेतलेल्या अनेक महत्त्वाचे निर्णयांची माहिती दिली आहे. एका क्लिकवर जाणून घ्या राज्य सरकराने आज घेतलेले महत्त्वाचे निर्णय
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राज्यात पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
- नगरपंचायत/परिषद अध्यक्ष निवड थेट जनतेतून, अध्यक्ष/उपाध्यक्ष कार्यकाळ 2.5 वर्ष वरून 5 वर्ष, अविश्वास प्रस्तावाची मुदत 1 वर्ष ऐवजी आता 2.5 वर्ष
- सरपंच थेट जनतेतून निवडणार
- अविश्वास प्रस्तावाची मुदत आता 2 वर्ष
- बाजार समितींमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार बहाल
- आणिबाणी काळात कारावास भोगलेल्या बंदींना पेन्शन योजना पुन्हा सुरू, योजना बंद केलेल्या तारखेपासूनची थकबाकी सुद्धा देणार
- स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 : 12,409 कोटी रुपयांना मंजुरी
- अमृत 2.0 अभियान: 27,700 कोटी रुपयांना मंजुरी, आता संपूर्ण महाराष्ट्रात योजना राबविणार, पाणीपुरवठा, मलनिस्सारण योजनांवर अधिक भर
- जिल्हा परिषद अध्यक्ष मुदत संपली असल्यास तीन महिने मुदतवाढ देता येईल, अशी तरतूद