कोकणावर घोंघावतंय पुन्हा वादळ? कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा इशारा

WhatsApp Group

रत्नागिरी – आग्नेय बंगालच्या उपसागरामध्ये गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या २१ मार्चला त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाकडून कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.

गेले काहीवर्षे कोकण किनारपट्टीवरील वातावरणामध्ये कमालीचा बदल होऊ लागला आहे. या अस्थिर झालेल्या हवामान बदलाचा परिणाम जाणवू लागला आहे. सुरक्षित व शांत असलेल्या कोकण किनारपट्टीवर आता जवळपास दरवर्षी वादळे येऊ लागली आहेत. हवामान विभागाकडूनआत्ताही चक्क मार्च महिन्यामध्ये कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

२१ मार्च दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा मच्छिमारांना इतर राज्यांच्या जवळपासच्या भागात निवारा आणि सुरक्षित ठिकाणांची आवश्यकता भासू शकते. याकरीता वादळी हवामानामुळे जहाजांना सुरक्षित ठिकाण व इतर किनारपट्टीवरील राज्यातील मच्छिमारांना निवारा देण्यासाठी आवश्यक सूचना सर्व मच्छीमारांना पोहोचवणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.