
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आवडत्या स्टार्समध्ये करण वोहराचे नावही सामील आहे. कमी मालिकांमध्ये काम करूनही त्याने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. करिअरमध्ये उंची गाठणाऱ्या करणने आपल्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. नुकताच हा अभिनेता जुळ्या मुलांचा बाप झाला आहे.
करणने सांगितले की, त्याला जुळी मुले झाली आहेत. सकाळी, अभिनेत्याने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होता ज्यामध्ये तो त्याच्या पत्नीचा हात धरताना दिसत आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर करण आणि बेला आई-वडील झाले आहेत आणि या निमित्ताने ते खूप आनंदी आहेत.