Kolhapur: कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टरांची नावंही उघडकीस

WhatsApp Group

कोल्हापूर – कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यामधील पडळ येथे हे रॅकेट उघडकीस आल्याचे समजत आहे. कोल्हापूरमधील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या प्रकरणी स्टिंग ऑपरेशन केले आहे.

कोल्हापूरातील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामध्ये अवैधरित्या गर्भपात होत असल्याची गुप्त माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीला मिळाली होती. त्यानंतर स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकण्यात आला तेव्हा गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा मोठा साठा सापडला, हा सर्व प्रकार पाहून पोलीसही चक्रावले आहेत.

या प्रकरणी गर्भलिंग निदान करणाऱ्या अनेक डॉक्टरांची नावही समोर आली आहेत. उमेश पोवार, हर्षल नाईक सोबत आणखी काही आरोग्य कर्मचारी परवानगी नसताना देखील गर्भपात करत असल्याची माहिती समोर आली.