IIT Baba Video: “भारत हरणार म्हणणाऱ्या” IIT बाबला मारहाण! व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

प्रयागराज – महाकुंभ मेळ्यातून प्रसिद्ध झालेल्या आयआयटी बाबाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. आयआयटी बाबांनी स्वतः इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत हा संपूर्ण प्रकार उघड केला आहे. प्राप्त माहितीनुसार, आयआयटी बाबा नोएडामधील एका खासगी वृत्तवाहिनीच्या डिबेट कार्यक्रमात सहभागी झाले होते. या चर्चासत्रादरम्यान त्यांच्या सोबत गैरवर्तन झाले आणि त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर बाबांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलन सुरू केले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर आयआयटीयन बाबा अभय सिंग सोशल मीडियावर खूपच ट्रोल होत आहे. त्याने सामन्यापूर्वी एक मोठी भविष्यवाणी केली होती.

भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यापूर्वी आयआयटीयन बाबांनी एक मोठी भविष्यवाणी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागेल, असे त्यांनी म्हटले होते. कोहली कितीही ताकद लाऊदेत, भारत कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकणार नाही असा दावा आयआयटी बाबाने केला होता.

पण भारत-पाकिस्तान सामन्या बाबतचा आयआयटीयन बाबाचा अंदाज चुकला. भारताने हा सामना जिंकला आणि विराट कोहलीनेही या सामन्यात एक दमदार शतकही झळकावले. आता भारतीय संघाच्या विजयानंतर बाबाला वाईटरित्या ट्रोल केले जात आहे. आता मारहाणीीची घटना समोर आलीय.