IIFA Awards 2022 : बॉलिवूडसह मराठी अभिनेत्रीनेही ‘IIFA’मध्ये मारली बाजी, पाहा कोणकोण ठरले पुरस्काराचे मानकरी?

WhatsApp Group

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी म्हणजेच आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. हा सोहळा गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित करण्यात येतो. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा अबू धाबी येथे दिमाखात पार पडला. यंदा या सोहळ्याचे 22वे वर्ष होते. कलासृष्टीमधील मानाचा मानल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांना IIFA Awards 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘सरदार उधम’ या चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर ‘मिमी’ या चित्रपटासाठी अभिनेती क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

आयफा पुरस्कार सोहळ्याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – विष्णु वर्धन (शेरशाह)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – विकी कौशल (सरदार उधम)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सेनॉन (मिमी)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (ल्युडो)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – सई ताम्हणकर (मिमी)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता – अहान शेट्टी (अहान शेट्टी)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – शर्वरी वाघ (बंटी और बबली २)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – जुबिन नौटियाल रतन लंबियां (शेरशाह)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – असीस कौर, रतन लंबियां (शेरशाह)
  • सर्वोत्कृष्ट संगीत – ए आर रहमान (अतरंगी रे), तनिष्क बागची, जसलीन रॉयल, जावेद-मोहसीन, विक्रम मॉन्ट्रोसे, बी प्राक, जानी (शेहरशाह)