Video: 6,6,6,6,6,6 इफ्तिखार अहमदचा मैदानात धुमाकूळ, 6 चेंडूत ठोकले 6 षटकार

WhatsApp Group

Iftikhar Ahmed: पाकिस्तानच्या इफ्तिखार अहमदने टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या एका प्रदर्शनीय सामन्यात इफ्तिखारने तुफानी फलंदाजी केली आणि वेगवान गोलंदाज वहाब रियाझला 6 चेंडूत 6 षटकार मारण्याची अप्रतिम कामगिरी केली. क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर जाल्मी यांच्यात हा प्रदर्शनीय सामना खेळला जात होता. या सामन्यात ग्लॅडिएटर्सच्या वतीने अहमदने फलंदाजी केली, इफ्तिखार अहमदने सामन्यात धमाका करताना 50 चेंडूत 94 धावांची खेळी केली. इफ्तिखारच्या झंझावाती खेळीच्या जोरावर ग्लॅडिएटर्स संघाला 20 षटकांत 5 बाद 184 धावा करता आल्या. इफ्तिखार अहमद 6 चेंडूत 6 षटकार मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पेशावर झल्मीकडून डावाच्या शेवटच्या षटकासाठी वहाब रियाझ आला. पण या प्रदर्शनीय सामन्यात त्याच्यासोबत असे काही घडणार होते, ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल. पाकिस्तान क्रिकेट संघाचा सहकारी खेळाडू इफ्तिखार अहमदने त्याच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत 6 चेंडूत 6 षटकार मारले. हा एक प्रदर्शनीय सामना असला तरी इफ्तिखारने मारलेले 6 षटकार सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

क्रिकेटमध्ये षटकार मारण्याचा थरार चाहत्यांसाठी नेहमीच बोलका असतो. फलंदाज कोणताही असो, तो असा पराक्रम करण्यात यशस्वी ठरला तर त्याची सर्वत्र चर्चा सुरू होते. आता पाकिस्तानच्या इफ्तिखारने प्रदर्शनीय सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार मारून सर्वांनाच थक्क केले आहे.

1 षटकात 6 षटकार मारणारे फलंदाज

  1. गॅरी सोबर्स
  2. रवी शास्त्री
  3. हर्शल गिब्स
  4. युवराज सिंग
  5. जॉर्डन क्लार्क
  6. किरॉन पोलार्ड
  7. मिसबाह-उल-हक
  8. हजरतुल्ला जझाई
  9. थिसारा परेरा
  10. रवींद्र जडेजा
  11. जसकरण मल्होत्रा ​​
  12. लिओ कार्टर
  13. अॅलेक हेल्स
  14. इफ्तिखार अहमद