
Chanakya Neeti: आयुष्यात आपल्याला अशा अनेक सवयी असतात ज्यामुळे आपल्या यशाचा मार्ग (success in life) बंद होतो. या सवयी वेळीच बदलल्या नाही तर यश मिळवण्यात अडचणी येतात. यामुळे आपली प्रगती (Progress) थांबते आणि अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. यामुळे वेळेतच या सवयी बदलणे खूप आवश्यक असते. अन्यथा इच्छा असुनही तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आज आपण अशाच काही वाईट सवयींविषयी जाणून घेणार आहोत…
अस्थिर मन
चाणक्य नीतिनुसार अस्थिर मन ही सर्वात वाईट सवय आहे. ज्या व्यक्तीचे मन स्थिर नसते ती व्यक्ती कधीच आनंदी राहू शकत नाही. अशी व्यक्ती स्वतःकडे सर्व काही असुन देखील मन स्थिर ठेवू शकत नाही. यामुळे ती आयुष्यभर अडचणींमध्येच राहते. यामुळे आपले मन हे स्थिर असणे गरजेचे असते. आपल्याकडे काही असो किंवा नसो आपले मन हे स्थिर असणे आवश्यक असते. यामुळे आपल्या यशाचे मार्ग खुले होतात.
मनावर नियंत्रण
मन स्थिर असण्यासोबतच त्यावर नियंत्रण असणे देखील आवश्यक असते. कारण ज्या व्यक्तीचे मन नियंत्रणात नसते. ती व्यक्ती सर्व काही असुन देखील संतुष्ट राहू शकत नाही. अशा वेळी तुम्ही कितीही मेहनत केली तरी त्या व्यक्तीला खुश करणे हे अश्यक आहे. यामुळे मनावर नियंत्रण असणे हे अत्यंत गरजेचे असते.
इतरांच्या आनंदात दुःखी
जी व्यक्ती इतरांच्या आनंदात आनंदी होऊ शकत नाही ती व्यक्ती नेहमी एकटी राहते. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणे हा व्यक्तीमधील सर्वात मोठा गुण असतो. दुसऱ्यांचे यश पाहून जर व्यक्ती दुःखी होत असेल तर तो स्वतःच्या यशावरही आनंदी होऊ शकत नाही. अशा वेळी यश त्यांच्याकडे जास्त काळ टिकून राहत नाही.
मेंदूवर नियंत्रण नसणे
ज्या व्यक्तीचे आपल्या मेंदूवर नियंत्रण नसते त्यांचे मन कोणत्याही कामी येत नाही. चाणक्य नीतिनुसार ज्यांचा मेंदू हा चंचल असतो ती व्यक्ती कोणत्याच कामावर फोकस ठेवू शकत नाही. हा त्याच्यातील सर्वात मोठा वाईट गुण आहे. यामुळे यश मिळवण्यात अडचणी येतात. कितीही मेहनत केली तरी देखील हाती निराशाच लागले. यामुळे मेंदूवर नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे असते.