हिवाळ्यात या 6 गोष्टी खाल्यास शरीर राहिल उबदार, मिळेल मोठ्या आजारांपासून संरक्षण

WhatsApp Group

कडाक्याच्या थंडीपासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करतात, कोणी उबदार कपडे वापरतात कोणी शेकोटी करतात तर कोण घराच्या बाहेरच जास्त पडत नाहीत. मात्र काही वेळा हे सगळे उपाय करूनही त्याचा हव्या त्या प्रमाणात फायदा होत नाही. अशा परिस्थितीत हिवाळ्यात आढळणाऱ्या काही खास गोष्टी  आपण खाल्या तर या कडाक्याच्या थंडीपासून आपण आपलं संरक्षण जास्त करु शकतो. तसेच  या गोष्टी खाल्यास शरीर आतून आणि बाहेरून उबदार राहिल आणि त्यासोबत अनेक आजारांपासूनही आपल्याला संरक्षण मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात या खास गोष्टी कोणत्या आहेक त्या. यातील काही गोष्टी तर आपल्याला सहज मिळू शकतात.

रताळे – रताळे हिवाळ्यात भेटवस्तूपेक्षा काही कमी नाहीये. यात असलेल्या कॅलरीज आणि उच्च पोषक तत्वांमुळे शरीराला प्रचंड ऊर्जा मिळते. रताळ्याला फायबर, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत मानला जातो. रताळ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. रताळे चवीलादेखील गोड असतं.

खजूर- खजुराचे सेवन केल्याने आपल्याला वजन वाढण्याची समस्या कमी होते. जिम करणाऱ्यांसाठी खजूर हे अत्यंत उपयोगी आहे कारण खजुरामद्धे पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. थंडीच्या दिवसात आहारामद्धे खजुराचे सेवन केल्यास शरीर उबदार राहण्यास मदत होते.

बदाम आणि अक्रोड – बदाम आणि अक्रोड हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कारण शरीरातील इन्सुलिनची प्रकिया सुधारण्यासाठी बदाम आणि अक्रोड अत्यंत उपयोगी आहे. अक्रोड मध्ये असलेल ओमेगा- 3 या अ‍ॅसिडमुळे शरीराला खूप फायदा होतो. बदामाच्या सेवनाने शरीरातील श्रमता, नियंत्रनात ठेवण्यास मदत होते. लहान मुलांना बदामाचे सेवन केल्यास त्रास, ताणापासून मुक्ती मिळते.

हेही वाचा – सफरचंद खाण्याचे हे 9 फायदे

नाचणी – हिवाळ्यात नाचणीमुळे आपल्या आरोग्यालाही खूप फायदा होतो. आपल्या शरीरात कॅल्शियमचा पुरवठा करण्यासाठी तुम्ही नाचणीची निवड करू शकता नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. तसेच नाचणीचा वापर मधुमेहाच्या त्रासापासून देखील आराम देते, अ‍ॅनिमियामध्येही आराम देण्यास नाचणी फायदेशीर ठरते. चिंता, मनावर असलेला ताण, नैराश्य यावर देखील नाचणीचा मोठा प्रभाव पडतो. नाचणी आपल्याला कोणत्याही किरणा दुकान मध्ये मिळते.

बाजरी – बाजरीचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील फायबर वाढण्यास मोठी मदत होते. बाजरीत आयर्न प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीरावर त्याचा खूप फायदा होतो. बाजरीचे सेवन केल्याने हाडे मजुबत होण्यास मदत होते. बाजरीचे लाडू किंवा भाकरी करून तुम्ही खाऊ शकता.