Narayan Rane: नारायण राणेंचं मोठं विधान, म्हणाले…’उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाईन’

WhatsApp Group

Narayan Rane: शिवसेनेचा दसरा मेळावा येत्या 5 ऑक्टोबरला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट या दोघांचा वेगवेगळा मेळावा होणार आहे. यानिमित्ताने राज्यातील राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे तर शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानावर होणार आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक मोठं विधान केलं आहे.

दसरा मेळाव्याला तुम्ही जाणार का? असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राणे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी आमंत्रण दिलं तर मी नक्की जाईन” तसेच उद्धव ठाकरेंनीही मला आमंत्रण दिलं तर मी दसरा मेळाव्याला जाईन. पण उद्धव ठाकरे मला आमंत्रण देणार नाहीत, हे माहिती आहे, असंही नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

राणे पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत त्यांनी शिंदे गटात सामील व्हावे कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची नाहीय, अडीच वर्षे या राज्याला ज्यांनी मागे नेले त्यांचे नाव घ्यायचे नाही आणि जे पक्ष त्यांना पाठींबा देण्याच काम करत आहेत त्यांची अवस्था सध्या काय आहे. मग ते काँग्रेस असो वा राष्ट्रवादी, या शब्दातही त्यांनी निशाणा साधला.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा