जर तुम्ही फेसबुक अकाउंट लॉगइन (Facebook Account Lock) करू शकत नसाल, तर कदाचित तुमचे अकाउंट लॉक झालेलं असू शकतं. तुम्ही तुमच्या फेसबुकमध्ये फेसबुक प्रोटेक्ट (Facebook Protect) अॅक्टिवेट केले नसेल तर असे होऊ शकते. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच फेसबुकने आपल्या युजर्सला एक मेसेज पाठवण्यास सुरुवात केली होती. ‘Your account requires advanced security from Facebook Protect’असा मेसेज फेसबूक कडून पाठवला जात होता, जेणेकरुन युजर एका निश्चित तारखेपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये Facebook Protect अॅक्टिवेट करू शकेल. हे अॅक्टिवेट न केल्यास तुमचे अकाउंट लॉक होण्याची शक्यता आहे.
The Verge च्या रिपोर्टनुसार, कंपनी युजर्सला 17 मार्चपर्यंत Facebook Protect ऑन करण्यासाठी मेल पाठवत होती. असे न केल्यास अकाउंट लॉक करण्याचेही त्यात सांगण्यात आले होते. [email protected] कडून हा मेल पाठवण्यात आला होता. परंतु हा मेल अनेक युजर्सच्या स्पॅम फोल्डरमध्ये गेला. कंपनीने हाय-रिस्क युजर्सला 17 मार्चपर्यंत अकाउंट प्रोटेक्ट (Facebook Account Protect) करण्यासाठी सांगितले होते. अनेकांनी ट्विटरवर त्यांच फेसबुक लॉक झाल्याची तक्रार केली आहे.
असं अॅक्टिवेट करा Facebook Protect –
- सर्वात आधी फेसबुक टॉप राइट कॉर्नरमध्ये डाउनवार्ड फेसिंग अॅरोवर क्लिक करा.
- आता Settings and Privacy मध्ये Settings मध्ये जा.
- त्यानंतर Security and Login वर क्लिक करा.
- त्यानंतर Facebook Protect मध्ये Get Started वर क्लिक करा.
- आता Next वर क्लिक करुन पुढील प्रोसेस करा.