All The Best! आज आयसीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, असा पहा निकाल..

WhatsApp Group

ICSE 10th Result 2022: ICSE 10वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) ICSE (इयत्ता 10) चा निकाल आज संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. cisce.org आणि results.cisce.org या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेचा निकाल पाहू शकतील. विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही निकाल पाहता येणार आहे.

ICSE बोर्डाने मे महिन्यात दहावीच्या परीक्षेचे आयोजन केले होते. त्यानंतर विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 33 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना नापास घोषित केले जाईल. मात्र, परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी कंपार्टमेंट परीक्षेला बसून त्यांचे वर्ष वाचवू शकतील. सीआयएससीई बोर्डानेही या वर्षी बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेतली.

असा पाहा निकाल

  • आयसीएसई बोर्डाच्या https://results.cisce.org/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • त्यानंतर येथे तुमचा युनिक आयडी आणि क्रमांक प्रविष्ट करा.
  • आता तुम्हाला निकाल पाहता येईल.
  • याशिवाय तुम्ही SMS द्वारेही निकाल पाहू शकता.
  • यासाठी तुम्हाला ICSE<Space><Unique Id> हा मेसेज 09248082883 या क्रमांकावर पाठवा. यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे तुम्हाला निकाल पाहता येईल.